रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (22:04 IST)

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, व्यक्तीचा शोध लावण्यात यश

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात  यश आले आहे. धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
 
पोलिसांना आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा हा निनावी कॉल कंट्रोल रुमला आला. मुंबई येथील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा कॉल करणारा व्यक्तीचे नाव सागर मांढरे असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडा या गावाचा रहिवासी आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर मांढरे वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या खाणी लगतच्या जमिनीचा सातबारा तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या सर्व पातळ्यांवर मागत असून याच प्रकरणी त्याने मंत्रालयात ही तक्रार केली आहे. तक्रारीसंदर्भात तो यापूर्वी मंत्रालयातही जाऊन आला आहे. मात्र, मागणीनुसार जमिनीचा सातबारा त्याच्या नावावर होत नसल्यामुळे तो अशाच पद्धतीने विविध कार्यालयांमध्ये फोन करत राहतो. यापूर्वीही त्याने काही सरकारी कार्यालयांमध्ये असे धमकीचे फोन केल्याची माहिती आहे.