गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 30 मे 2021 (17:37 IST)

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकीचा तपास कार्य सुरु

मंत्रालयातून एक मोठी बातमी येत आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी  फोन आला.तेव्हा पासून मंत्रालयाची सुरक्षा वाढविण्यात आली असून त्या निनावी फोनचा तपास करणे सुरु झाले आहे.

या फोन नंतर बॉम्बशोधक पथक ने मंत्रालयात शिरकाव करत संपूर्ण परिसरात शोध घेत आहे. मंत्रालयाच्या बाहेर आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास पोलीस कंट्रोलरूम मध्ये मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याचा एक अज्ञात फोन आला.त्यानंतर पोलिसांकडून मंत्रालयातील आणि इतर बाजूस शोध लावण्याचे कार्य कसून सुरु आहे.बॉम्ब पथकासह डॉग स्क्वाड देखील तपास कार्य करत आहे.श्वानाच्या मदतीने देखील तपास सुरु आहे.खरं तर एवढी मोठी आणि चौकस सुरक्षा व्यवस्था असताना हा बॉम्ब कसा आणि कधी ठेवला गेला याची सर्वत्र चर्चा होत आहे.पोलीस याचा तपास करीत आहे.