या कारणांमुळे पुरुष बोलतात खोटं
भूतकाळ लपवतात
अनेक पुरुष आपल्या भूतकाळाशी जुळलेल्या गोष्टी लपवतात. कोणी आपल्या भूतकाळात जावं हे त्यांना मुळीच आवडत नाही. कारण नेहमी स्त्रिया पुरुषांना भूतकाळावरून त्यांचं व्यक्तिमत्त्व ठरवतात. त्यांनी आधी काही चुका केल्या असू शकतात ज्याबद्दल चर्चा व्हायला नको असे त्यांना वाटतं असतं.
देखावा अधिक
पुरुषांना देखावा करायला आवडतं. कोणासमोर आपले वाईट गुण दिसायला नको म्हणून ते खोटा व्यवहार करून स्वत:चा चांगला रूप प्रस्तुत करतात.
दुरी ठेवण्यासाठी
काही पुरुष दुरी राहावी म्हणूनही खोटं बोलतात. आपल्यात आणि त्यांच्यात एक लक्ष्मण रेषा खेचलेली असावी यासाठी ते असं करतात किंवा गोष्टीत त्यांच्या भूतकाळाबद्दल किंवा अश्या एखाद्या घटनेबद्दल प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते लांब राहणे पसंत करतात.
आपली परीक्षा घेण्यासाठी
आपल्या मनात त्यांच्यासाठी खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी काही पुरुष खोटं बोलतात. एखादं खोटं आपल्यासमोर प्रस्तुत करून आपली प्रतिक्रिया बघू इच्छित असतात.
खोटं बोलण्यात हरकत नाही
अनेक पुरुष विचार करतात की खोटं बोलण्यात काय वाईट. हल्ली सगळेच खोटं बोलतात. काही पुरुषांना खोटं बोलण्यातच मजा वाटतो.
वर्चस्व गाजवण्यासाठी
डॉमिनेट करण्यासाठी पुरुष कोणत्याही थराला जाऊ शकतात. वर्चस्व गाजवण्यासाठी ते खोटं बोलतात आणि यावर महिला सहज प्रभावित होऊन जातात.
संशयास्पद स्वभाव
पुरुष महिलांवर सहज विश्वास करत नाही. मनातील शंका त्यांना खोटं बोलण्यासाठी भाग पाडते. जोपर्यंत त्यांना पूर्णपणे विश्वास बसत नाही ते सत्य काय ते सांगत नाही.
तर खोटं बोलण्यामागे काय कारण असू शकतात हे तर कळून आलंच तर पुढल्यावेळी पुरुष खोटं बोलत असतील तर त्यामागे काय कारण असावं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा नंतर तो आपल्यासाठी योग्य आहे वा नाही ठरवावे.