मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चीनच्या शाळेत शिकवली जाते डेटिंग

डेटिंग यशस्वी पार पडावी म्हणून काय करावे? हा प्रश्न मनात असला तर याचे उत्तर चीनच्या एका शाळेकडे आहे. येथे तरुणांना यशस्वी डेटिंगसाठी ट्रेनिंग दिली जाते.
 
चीनमध्ये तरुणांनी डेटिंगवर काय करावे हे शिकवण्यासाठी शाळा आणि कोचिंग सेंटर उघडत आहे. बीजिंगमध्ये यी कुई नावाच्या व्यक्तीद्वारे संचलित एक अशीच शाळा लव्ह एनर्जी आहे. लव्ह कोचिंगचं क्रेझ येथे वाढत चालले आहे. याचा ऑनलाईन कोर्स 30 डॉलर प्रति महा करता येतो. क्लासमध्ये जाऊन लव्ह आणि डेटिंगमध्ये स्वत:ला योग्य करायचं असल्यास महिन्यात 4500 डॉलर पर्यंत खर्च करावं लागू शकतं.
 
यी कुई यांच्याप्रमाणे अधिकतर ग्राहकांचे वय 23 ते 33 वर्षाच्या आत आहे. सर्वात लहान वयाच्या मुलगा 19 तर सर्वात वयस्कर विद्यार्थ्याचे वय 59 वर्ष आहे. येथे विद्यार्थ्यांचे मेकओव्हर केलं जातं आणि सोशल मीडियावर टाकण्यासाठी त्यांचे चांगले फोटो काढले जाता. कोचिंगच्या तुलनेत ऑनलाईन कोर्सची डिमांड अधिक आहे, तसेच हे सोपे ही आहे.
 
कुईप्रमाणे अनेक तरुण मुलींशी बोलण्यात लाजतात. त्यांना नाकारण्याची भीती असते. अंतर्मुखी तरुणासमोर आणखी आव्हाने असतात. ते मुलींशी प्रेमाबद्दल बोलण्यात भितात. या आव्हाना सामोरा जाण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज असते. डेटिंग नृत्याप्रमाणे आहे ज्यात आपल्याला साथीदाराला आपल्याकडे ओढायचं असतं.