मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

प्रेमात पडून लठ्ठ व्हाल

तुमचं कोणावर प्रेम असेल किंवा जेव्हा तुम्ही प्रेमात पडला असाल तर एक गोष्ट लक्षात आली का? अत्यंत मनापासून प्रेम करणार्‍या व्यक्तीला अपोआपच अंगावर मूठभर मास चढते, असे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे.
 
एका निष्कर्षात समोर आले की स्थिर नातेसंबंधांमुळे वजन वाढत असते. ऑस्ट्रेलियातील सेंट्रल क्वीन्सलैंड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. अधिक आरोग्यदायक आहार घषउनही आणि फळे व भाजीपाल्याचाच आहार घेतल्यानंतरही जोडप्यांनी राहणार्‍या व्यक्तींचे वजन एकटे राहणार्‍यापेक्षा जास्त असते, असे या संशोधनातून दिसले आहे.
 
अर्थात यामागचे कारणही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. या व्यक्तींना एखाद्या संभाव्य जोडीदारावर छाप पडण्याची चिंता उरलेली नसते, त्यामुळे त्या लठ्ठ होऊ शकतात. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी बारीक दिसण्याची गरज राहिलेली नसते तेव्हा ते आधिक शर्करा असलेले पदार्थ खाण्यात भीती बाळगत नाहीत.