मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Modified: गुरूवार, 20 सप्टेंबर 2018 (09:16 IST)

वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात मोदींकडे ३१ मार्च पर्यंत एकूण २ कोटी ३० लाख रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. त्यापैकी १ कोटी रुपये किंमतीची ३ हजार ५०० चौरस फुट जमीन आहे. मोदींजवळ १ लाख ३८ हजार रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची कार नाही. पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी दागिन्यांची खरेदी केलेली नाही.  
 
मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ११ लाख ३० हजार रुपये जमा केले आहेत. याशिवाय १ कोटी ७ लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१२ पासून एका इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डमध्ये २० हजार रुपये डिपॉझिट केले आहेत. तसेच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये ५ लाख २० हजार, जीवन विमा योजनेत १ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. आकडेवारीनुसार मोदींकडे ४८ हजार ९४४ रुपयांची रोकड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्याकडील रोकड ६७ टक्क्यांनी कमी झाली आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींजवळ दीड लाख रुपयांची रोख रक्कम होती. मोदींनी कोणत्याच बँकेकडून कर्ज घेतलेले नाही.