शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचे शिव सेना हिंदुस्थानकडून दहन

फगवाडा: शिवसेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून आज वाढत्या इंधन दरांच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे धन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवसेना हिंदुस्थानचे उपाध्यक्ष मनीष सूद यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील इंधनाच्या वाढलेल्या भावांविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील घोषणा देत, त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.
 
यावेळी बोलताना मनीष सूद म्हणाले की “नरेंद्र मोदी यांचं सरकार हिंदूंच्या मतांवर सत्तेत आले परंतु सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी केलेले वायदे सत्तेत आल्यानंतर मात्र हवेत विरले. संपूर्ण हिंदू समाजाचा मोदींनी विश्वासघात केला असून येणाऱ्या २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.”