गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

बेक फिश

साहित्य: 500 ग्रॅम मासे, 1/4 तूप, 1/4 कप मैदा, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा तिखट, 2 कप दूध, 4-5 हिरव्या मिरच्या कापलेल्या, 1/2 कप मश्रृम, 1/2 कप पांढरी वाईन. 

कृती: मासे स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून घ्या. ओव्हनला 200 डि.से.वर गरम करून घ्यावे. 4 लहान बेकिंग डिशमध्ये तेल लावावे. एका कढाईत तूप गरम करून त्यात मश्रृम आणि पांढरी वाईन घालून 8 मिनिट परतून घ्यावे.

नंतर त्यात माशांची तुकडे टाकावे व 5 मिनिट शिजू द्यावे. मैदा, मीठ आणि तिखट घालून परतावे. त्यात दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. वरून हिरवी मिर्ची घालून बेकिंग डिशमध्ये ओव्हनमध्ये बेक करण्यास ठेवावे.