1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मार्च 2025 (14:28 IST)

हैदराबादी मटण पुलाव रेसिपी

Hyderabadi Mutton Pulao
साहित्य- 
मटण- ४०० ग्रॅम
बासमती तांदूळ- तीन कप
दालचिनी- एक तुकडा
लवंगा -चार   
मिरे पूड 
तमालपत्र- चार 
हिरव्या मिरच्या 
वेलची 
जिरे- अर्धा टीस्पून 
वेलची 
धणे-तीन चमचे
आले-
लसूण
लवंग
कांदे 
काश्मिरी लाल मिरची 
चवीनुसार मीठ
कृती-
सर्वात आधी मटण स्वच्छ करा तसेच ते कोमट पाण्याने धुवा, मटण पाण्यातून बाहेर काढा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्या भांड्यात एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घाला आणि हाताने चांगले मिसळा आणि बाजूला ठेवा. मटण मॅरीनेट होईपर्यंत, आपण एका पॅनमध्ये दालचिनी, २ तमालपत्र,  जिरे, मिरेपूड, मोठी वेलची, छोटी वेलची आणि सुकी संपूर्ण धणे असे संपूर्ण मसाले घालावे. आता गॅस वर पॅन ठेवा आणि चमच्याने ढवळत दोन मिनिटे मसाले तळा, मसाले तळले की, ते एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या. आता मसाले एका मिक्सर जारमध्ये घालून त्यात आले, लसूण, थोडे पाणी घाला आणि बारीक वाटून घ्या. आता एक कुकर गॅसवर ठेवा त्यामध्ये चार टेबलस्पून तेल घाला, तेल गरम झाल्यावर दोन लवंगा आणि दोन तमालपत्र घाला, चार सेकंद परतून घ्या आणि बारीक चिरलेला कांदा घाला. आता कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा हलका सोनेरी झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाले घाला. चांगले परतून घ्या. हे मसाले तळले की त्यात मॅरीनेट केलेले मटन घाला. मॅरीनेट केलेले मटन आणि मसाले चांगले मिसळा. आता मटन मंद आचेवर मऊ होईपर्यंत शिजवा. मटन मऊ झाल्यावर काश्मिरी लाल मिरची घाला आणि मिक्स करा. आता त्यात तीन कप पाणी घाला आणि उकळू द्या. आता चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करा. तांदूळ आणि मीठ घातल्यानंतर, कुकरचे झाकण बंद करा आणि कुकरला एकदा शिट्टी द्या. तसेच कुकर थंड झाल्यावर मटण  पुलाव एक प्लेटमध्ये काढा. व गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.