1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

एग पराठा

एग पराठा
साहित्य: 2 वाटी गव्हाचे पीठ, 2-3 अंडी, 1 कांदे, कोथिंबीर (बारीक चिरलेले), आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ, तेल किंवा तूप.

कृती: पिठात तेल, मीठ घालून भिजवा. आता कढईत तेल गरम करून त्यात कांदा, आले, लसूण घालून परता. हळद, मसाला, मीठ टाकून शिजवा. त्यात अंडी फोडून टाका. त्यातील पाणी आटवा. कोथिंबीर टाका आणि मिश्रण गार होऊ द्या. आता कणकेचा गोळा तयार करून त्यात अंड्याचे मिश्रण घाला व हळूहळू लाटा. नॉनस्टीक तव्यावर खरपूस भाजून वरून तेल किंवा तूप सोडा.