चिकन पेपर स्टिक
|
कृती : चिकन खिमा, मीठ, तिखट, अंडी व चिरलेली शिमला मिरची या सर्व साहित्याला मिसळून त्याचे 8 भाग करून घ्यावे. सर्व चिकन ब्रेस्ट्सवर मिश्रण लावून त्यांना आकार द्यावा. वरून काळे मिर्याची पूड टाकावी व 4-5 मिनिट फ्रिजमध्ये ठेवावे. तव्यावर तेल गरम करून त्यात चिकन ब्रेस्ट्सला दोन्हीकडून परतून घ्यावे.
दुसर्या तव्यावर लोणी गरम करून उरलेली काळ्यामिर्याची पूड त्यात टाकावी नंतर चिरलेले कांदे व लसूण टाकून 1 मिनिटापर्यंत परतून त्यात रेड वाइन टाकावी. ब्राउन सॉस, मीठ व चिकन ब्रेस्ट टाकून 4-5 मिनिट चिकन नरम होईस्तोर उकळावे. चिकन तुकड्यांना डिशमध्ये काढावे व उरलेले सॉस टाकून फ्रेंच फ्राइस व भाज्यांसोबत सर्व्ह करावे.
