मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन मेवा पुलाव

चिकन मेवा  बासमती तांदुळ
ND
साहित्य : 250 ग्रॅम बोनलेस चिकन, अर्धा किलो बासमती तांदुळ, 125 ग्रॅम कांदा, 125 ग्रॅम टोमॅटो, 12 ग्रॅम आलं, लसण, 25 ग्रॅम जिरं, खसखस, काजू, 12 ग्रॅम चिरोंजी, इलायची, एक वेलदोडा, एक ताब्रपत्र, 2 लवंगा, मीठ चवीनुसार, 25 ग्रॅम तूप किंवा तेल, अर्धा चमचा गरम मसाला.

कृती : जीरं, धने, खसखस, काजू आणि चिरोंजी हे सर्व साहित्या कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आलं व लसणाचे पेस्ट वेगळे तयार करावे. कढईत तेल गरम करून त्यात इलायची, ताब्रपत्र, चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतावे. त्यात चिरलेले टोमॅटो टाकावे. त्यानंतर मीठ, हळद, जीरा पूड व गरम मसाला टाकून परतावे.

जेव्हा सर्व मिश्रणाला तेल सोटेल तेव्हा त्यात जीरं, धने, खसखस ‍व चिरोंजीचे पेस्ट टाकावी. 2-3 मिनिटानंतर त्यात चिकन टाकून 15-20 ‍मिनिट परतावे व पाणी टाकून शिजवून घ्या. जेव्हा चिकन अर्धवट शिजेल तेव्हा त्यात तांदुळ टाकावे.

तांदुळातील पाणी संपल्यावर त्याला 15 मिनिटपर्यंत मंद आचेवर शिजवावे. सर्व्ह करताना त्यावर चिरलेले कच्चा कांदा व कोथिंबीर टाकावी.