शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

चिकन स्ट्यू

चिकन बटर गाजरे कांदे
ND
साहित्य : 1 किलो कोंबडीचे तुकडे, 4 मोठे चमचे बटर, 2 तमालपत्रे, 4 लवंगा, 1 1/2 कप चिकन स्टॉक, 5 मोठी गाजरे सोलून तुकडे केलेली, 2 मध्यम कांदे 4 भागात कापलेले, 4 मध्यम बटाटे सोलून चार भागात कापलेले, 1 मोठी भोपळी मिरची कापलेली, 5 छोटे चमचे मीठ, 1/2 चमचा मिरे- जिरे पूड, 1/2 कप दूध, 2 मोठे चमचे मैदा.

कृती : कोंबडीच्या तुकड्यांचे 3 भाग करा. कुकरमध्ये बटर वितळवा. प्रत्येक भाग तांबूस होऊ न देता 2 मिनिटे परता आणि काढा. तमाल पत्र लवंग, स्टॉक आणि कोंबडीचे तुकडे टाका. चांगले ढळवा. नंतर कुकर बंद करून 5 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर त्यात दूध आणि मैद्या सोडून सर्व साहित्य घाला व 2 मिनिट परत शिजवा. थंड झाल्यावर मैद्यात हळू दूध एकजीव करून हे मिश्रण कुकरमध्ये ढवळा. सॉस दाट होईपर्यंत शिजवा.