1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

प्रॉन विथ नूडल्स

ND
साहित्य : 1 कांदा चिरलेला, 4 प्रॉन स्वच्छ केलेले, 1/4 कप फिश किंवा चिकन स्टॉक, 40 ग्रॅम उकळलेले नूडल्स, 1 जुडी पातीचा कांदा, 1 चमचा मोड आलेले कडधान्य, 2 पनीराचे तुकडे, 2-3 वाळलेले प्रॉन, 1 लहान गाजर किसलेली, 1 मोठा चमचा फिश सॉस, 1 मोठा चमचा राईस व्हिनेगर, 1/4 चमचा ब्राउन शुगर, 1/4 चमचा तिखट, 3 मोठे चमचे तेल.

टीप : तसं तर फिश सॉसमध्ये पर्यंत मात्रेत मीठ असतं पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. ऑम्लेट बनविण्यासाठी फेटलेल्या अंड्याचा घोळ मीठ टाकून.

कृती : कढईत तेल टाकून कांद्याला लाल होईस्तोर परतून घ्यावे. आता त्यात प्रॉन टाकून परतावे. नंतर त्यात चिकन स्टॉक, उकळलेले नूडल्स, पातीचा कांदा, कडधान्य, पनीराचे,वाळलेले प्रॉन, गाजराचा कीस टाकून चांगले परतावे. नंतर त्यात फिश सॉस, राईस व्हिनेगर, ब्राउन शुगर, तिखट व नूडल्स टाकून हळू हळू हालवावे.

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात अंडी टाकून ऑम्लेट बनवून घ्यावे. ऑम्लेटला खाली उतरवून त्याच्या मधोमध नूडल्स टाकावे. नूडल्समध्ये थोडेसे प्रॉनचे व पनीराचे तुकडे वेगळे काढून ठेवावे. आम्लेटी गुंडाळी करून पॉकिटासारखे करून घ्यावे. प्लेटमध्ये उलटून त्यावर प्रॉन, पनीर व कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा