1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. मांसाहारी

ब्रेड मिक्स ऑमलेट

अंड्याचे ऑमलेट बनविण्याची कृती
साहित्य - 2 अंडे, अर्धा कांदा, लाल मिरची, मीठ, तूप, हिरवी कोथिंबीर.

पूर्वतयारी- कांदा बारीक कापूण घ्यावा, अंडे फोडून द्रावण पातेल्यात काढावे व चमच्याने फेटून घ्यावे

कृती : अंडे फोडून चांगले फेटून घ्यावे. मीठ, मिरची पावडर, कापलेला कांदा व हिरवी कोथिंबीर त्यात मिसळावी. दोन्ही ब्रेड हाताने चुरून अंड्याच्या द्रावणात मिसळावे. चमच्याने फेटून मिश्रण एकजिनसी करावे.

नॉनस्टीक फ्राइंग पॅन गॅसवर ठेवून दोन चमचे तूप टाकावे. तूप गरम होऊन चांगल्या प्रकारे पसरल्यानंतर मिक्स केलेले अंड्याचे द्रावण पॅनवर टाकून गोलाकार पसरावे.

थोडा वेळ शेकल्यानंतर वरून तूप लावून परतून घ्यावे. दोन्ही बाजूने तांबूस होईपर्यंत शेकून घ्यावे. तयार झालेल्या आम्लेटचे चार-पाच तुकडे करून टोमॅटो सॉस सोबत खायला द्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा