सली बोटी (मटण करी)
|
कृती : आले व लसूण यांचे पेस्ट तयार करावे. कुकरमध्ये 1/2 तेल टाकून उभा चिरलेला कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता आले-लसणाचे वाटण घालून काही सेकंद ढवळा. मास आणि बारीक चिरलेला कांदा घाला. ढवळा आणि मांस बदामी होईपर्यंत परता. दालचिनी, मीठ आणि पाणी घाला. चांगले मिसळून 15 मिनिटे शिजवा. बटाटे परतून त्याचे दोन भाग करा. उरलेले तेल गरम करून त्यात बटाटे परता. तव्यावर साखर घालून गडद तपकिरी होईपर्यंत सतत परता. जरदाळू आणि राखीव पाणी घाला. साधारण 5 मिनिटे शिजवा. मटण शिजल्यानंतर त्यात बटाटे व जरदाळू घाला आणि 5 मिनिटे अधुनमधुन ढवळत शिजवा. व गरम गरम वाढा.
