महाराष्ट्रातले बेरकी 'पॉवरबाज' राजकारणी म्हणून शरद पवारांची ख्याती आहेच. पण 'योग्य वेळ' साधण्याची कलाही त्यांना अवगत आहे. म्हणूनच वेळ साधून राजकीय चाली करण्यात त्यांचा 'हात' कुणीही धरणारा नाही. आता हेच पहाना, एरवीही रमजान महिन्यात शरद पवार अनेक इफ्तार पार्ट्यांत दिसतात यात नवल काय? पण विधानसभा निवडणुका जाहिर झाल्या असताना आणि त्यातही राज्यात जातीय दंगल घडल्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी स्वतःच इफ्तार पार्टी आयोजित केली तर कुणाला आक्षेप असायचं काय कारण? याता याला कुणी मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी पवारांनी केलं असं म्हणू शकेल. म्हणोत बापडे. निवडणुका आल्या असताना धर्मनिरपेक्ष छबी ठळक करण्यासाठी इफ्तार पार्टी आयोजण्याची 'वेळ' मात्र त्यांनी साधली हेच महत्तवाचं. कदाचित तेच पवार पवार जॅकी श्रॉफ आणि तारिक अन्वर यांना घड्याळाचा हवाला देऊन दाखवत असावेत, नाही काय?
आणि हो, पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित या पार्टीला चित्रपट अभिनेत्यांपासून ते उद्योगपतींपर्यंत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती!
या फोटोबद्दल आपले मत खाली दिलेल्या रकान्यात नोंदवा.