1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. Kana Kusumagraj Kavita

कणा

ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी
 
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन
 
माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली
 
भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले
 
कारभारणीला घेऊण संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे चिखल गाळ काढतो आहे
 
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
 
मोडून पडला संसार तरि मोडला नाहि कणा
पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा.
 
_कुसुमाग्रज
पुढील लेख
SBI Clerk 2023: SBI मध्ये 8200 पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी बंपर भरती