Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ

Updated: मंगळवार, 3 जुलै 2018 (13:08 IST)
 
बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते 
दुःख समजून न घेण्याची 
अनेक बायकात उणीव असते  ll
 
सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात 
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll
 
सगळ्यांच्या आवडी जपता जपता 
मन मारीत जगत असतो 
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो  ll
 
इकडे आड तिकडे विहीर 
तशीच बायको आणि आई 
वाट्टेल तसा त्रास देतात 
कुणालाच माया येत नाही ll
 
त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका  ll
 
दोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं ll
 
समजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे  ll
 
मी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती ll
 
घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll
 
सारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं  ll
 
घरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll
 
नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी 
कुणाची आसवं गळतात का ? ll 
 
पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही 
कितीही पाय दुखले तरी 
मनावर कुणी घेत नाही  ll
 
वेदनांना कुशीत घेऊन 
ओठ शिउन ' तो ' पडून राहतो 
सर्वांच्या सुखासाठी 
एकतारी भजन गातो  ll
 
बायको आणि मुलांनी 
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला 
दोन थेंब सुख द्यावं    ll
 
मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे 
किती जणांच्या लक्षात येतं ? ll

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Skin Tone Lightening : या नैसर्गिक उपायांनी सुंदर त्वचा मिळवा, या टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात होणारा सर्दी-ताप टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या 10 सवयी

श्रावण महिन्यात उपवास करत असाल, तर ही तीन योगासने करायला विसरू नका

पौराणिक कथा : अशाप्रकारे हनुमानजी आकाशात उडायला शिकले

महिलांनी दरवर्षी कराव्यात या महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या; गंभीर आजारांपासून राहाल एक पाऊल पुढे

पुढील लेख
Show comments