सोमवार, 28 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By

निःशब्द प्रेमाची भाषा हीच

एक चोरटा कटाक्ष तुझा,
जीव झाला घायाळ माझा,
बोलली नाही काही जरासेही,
उमगले मला ते सर्वकाहीं,
निःशब्द प्रेमाची भाषा हीच,
शब्दांत सांगणे खरंच नकोच,
होतं गेलं आजवरी, हेच आपल्यात,
कुजबुज जाहली नसे जनात,
जिवा भावाचे असें हे दृढ बंध,
परस्परांशी असलेला गोड सम्बन्ध,
याहूनी आता मज काही नकोच,
जाणतो प्रिये मी तुझा संकोच,
आश्वासन मज असे हवे यापुढें,
होशील माझी, आयुष्य काढीन ह्यापुढे!
......अश्विनी थत्ते.