गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (09:31 IST)

वर्ड नारळ दिवस : नारळ वरदान आहे हेच खरं

Word Coconut Day
कल्पवृक्ष नाव उगा नाही पडले,
नाना विध गुण त्यात आहे हो दडले,
वृक्षाच्या सर्वच भागांचा यथायोग्य उपयोग,
मनुष्य घेतोय त्याचा भरपूर उपभोग,
पावित्र्य लाभले हो याच्या फळला,
पूजेचा महत्वाचा घटक तो बनला,
आरोग्य असो की असो गरज दैनंदिन,
पुर्ती होणारच नाही ना त्याच्या बिन!
असा हा बहुगुणी नारळ वरदान आहे हेच खरं,
म्हणून त्याचा उल्लेख अन गुणगौरव केलाय बरं!
...अश्विनी थत्ते