मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (17:43 IST)

खमंग, चविष्ट आहे वडा पाव

खमंग, चविष्ट आहे वडा पाव,
मुंबई करांचं, आवडतं खाद्य वडापाव,
कित्येकांची रोजी रोटी आहे वडापाव,
अनेकांचं जेवण असें वडापाव,
खिशाला परवडते म्हणून वडा पाव,
खाणारा खातो ताव मारून वडापाव,
कुठं आणि कधीही मिळे वडापाव,
रंक आणि राव खाती, आवडीने वडापाव,
लहान असो की थोर, त्यांना प्रिय वडापाव,
भाव अजिबात खात नाही , तोही खाई वडापाव,
असा आहे महिमा ज्याचा, त्याच नाव "वडा पाव"!
.....अश्विनी थत्ते