रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (17:05 IST)

Marath Kavita नानाविध इच्छा मनी उत्पन्न होतात

mothers day wishes
नानाविध इच्छा मनी उत्पन्न होतात,
कधी त्या स्वतः साठी तर कधी इतरांकरता असतात,
कुठं जाण्याची इच्छा, मनी उत्पन्न होते,
काही खाण्याची इच्छा मनी जागृत होते,
काही विशेष घालावं अस वाटून जातं,
ल्यावा एखादा दागिना, खूपदा मनात येतं,
एखाद्या नातेवाईकाची भेट घ्यावी वाटते,
आवडत्या मैत्रिणीची साद आल्यावर जावेसे वाटते,
देवासाठी एक कोपरा असतोच की मनात,
त्याच्या करीता काही करावं, योजना येते अंमलात,
कधी छोट्या तर कधी मोठ्या इच्छा  प्रत्येकाच्या असतात.
आपसूक पूर्ण होतात कधी त्या, कधी विशेष प्रयत्न करावे लागतात.!!
अश्विनी थत्ते.