1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (17:35 IST)

Marath Kavita भरवसा, ऐकायला हलका शब्द

भरवसा, ऐकायला हलका शब्द  जरी असला,
तो कमवायला कष्ट करावे लागतात आपल्याला,
खूप काळ जाऊ द्यावा लागतो, नंतर तो मिळतो,
मग नंतर तिथं उपस्थित जरी नसला तरी काम तो करतो,
पण एकदा का तो उडाला, की मग कठीण काम,
कित्तीही प्रयत्न करा, तरीही इतरांचं मत राहतं ठाम,
कधी भरवश्याच्या माणसावर अवलंबुन राहिलं की पंचाईत होते,
काम तर होतच नाही, पण पत ही खराब होते!
म्हणून तर मंडळी, भरवसा  घेऊ नका हलक्यात !
पण तो मिळवा नक्कीच, ते आहे आपल्या हातात!
..अश्विनी थत्ते.