मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (15:06 IST)

खुप बोलायचं असतं..

खुप बोलायचं असतं,
पण मूक व्हावं लागतं,
प्रकट व्हायची वाटे भीती,
विचित्रच असते परिस्थिती,
पण गुंता वाढतो भावनिक,
घालमेल, चिंताच असते अधिक,
कसा मार्ग निघावा कळेना?
नक्की काय करावं ते उमजेना!
प्रश चिन्हांच जाळ भोवती,
अशीच राहील का ही स्थिती?
सुटायला हवं आहे सगळं,
मगच वाटेल हायस अन मोकळं!!
...अश्विनी थत्ते