स्पर्श एक असा, पान्हा फुटवा,
स्पर्श एक असा, हुंदका दाटावा,
स्पर्श एक असा, रोमांच फुलावा,
स्पर्श एक असा, शहारा तो यावा,
स्पर्श एक असा, खुप सांगून जावा,
स्पर्श एक असा, डोळ्यात दिसावा,
स्पर्श एक असा, सुखावून जावा,
स्पर्श एक असा, नेहमीच हवाहवा,
स्पर्श एक असा, दिलासा व्हावा,
स्पर्श एक असा, उबदार राहावा,
स्पर्श एक असा, सोबतीला असावा,
स्पर्श एक असा, जाणीव व्हावा,
एक स्पर्श असा, दुःखात सुख व्हावा,
एक स्पर्श असा, रंग प्रेमाचा दिसावा,
एक स्पर्श असा, अवघा रंग एक व्हावा,
...अशी असावी भाषा, स्पर्शाची "निःशब्द"!!!
...अश्विनी थत्ते