अंतरंग
कित्ती बरं झालं असतं, अंतरंग दिसलं असतं!
कोणाशी कसं बरं वागायचं, हे समजलं असत!
रंग बदलतात लोक कसं, ते असंत उमगलं,
त्यानुसार आपण ही तसंच असतो वागलं!
चेहेरा असतो म्हणतात आरसा मनाचा!
दिसला नसता का भाव चेहेऱ्यावर माणसाचा?
ओठावर एक अन वागणं दुसरं नसत राहील!
डोकावलं असतो अंतरंगात, आधीच तयार राहिलो असतो!
पण नाही न तशी सोय, आपल्याला अशी!
म्हणून तर वागतात माणसं, त्यांना हवी तशी!
जाऊ दे लोकांचं आपण आपलं अंतरंग साफ ठेऊ या!
ज्यांना डोकवायच असेल त्यांना स्वागत करू या !!
....अश्विनी थत्ते.