शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (16:11 IST)

नात्यांना पण आयुष्य असतं बरं....

नात्यांना पण आयुष्य असतं बरं,
पण वाटत नाही आपुल्याला खरं,
एखादी ओळख होतें, घट्ट होत जाते,
त्यांच्या विना आपले पान ही हलणे अशक्य होते,
दिवस रात्र आपण संपर्कात येतो ज्याच्या,
कोणे दिवशी मात्र, सर्वात दूर असतो त्याच्या,
हे कसें, आणि का होतं ते समजत नाही,
पण कधी कधी मात्र, समजून वळत नाही,
राहतात मात्र, आठवणीच आठवणी,
येतं हसू ओठावर कधी, कधी मात्र पाणी,
समजत असत आपल्याला सैल होताहेत गाठी,
का पण माणूस धडपडतो, त्या घट्ट करण्या पाठी,
जे झालं ते स्वीकारावं, तेच असत शहाणपण,
नाहीतर आहेत नात्याची फरफड आणि वणवण .!
.....अश्विनी थत्ते.