Marathi Kavita स्वयंपाकघर म्हणजे, एक अशी जागा
स्वयंपाकघर म्हणजे, एक अशी जागा,
जोडून ठेवी घरातील प्रत्येक नात्यातील धागा,
प्रत्येकाच्या आवडी निवडी जपणार मन इथं वसत,
घरातील कित्येक वादळ पण इथंच शमत,
जो तो डोकावतो येता जाता इथं आपुलकीनं,
घरातील स्त्रीचा हात इथं फिरतो ममतेन,
सगळ्या चवी इथं चवीचवीने बनवतात,
खाणारे ही ते ढेकर देऊन, तृप्तीनं खातात,
घरातील तंबूचा मधला खांब तो असतो,
त्याच्या विना घराचा तोल कोण सांभाळू शकतो?
..अश्विनी थत्ते.