गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (16:01 IST)

प्रेम

प्रेम म्हणजे आपल्या
    स्मृति सुगंधने
         मनाच्या कोंदणात
जपून ठेवलेले वास्तव्य
 
प्रेम म्हणजे एक विश्वास
   जो जाणीव करुन देतो
कि मला पण
आवडणारं कोणी आहे
 
प्रेम म्हणजे हृदयावर
   भाव भावनांनी चितारलेलं
        जगातील अप्रतिम
खूप सुन्दर काव्य
 
प्रेम म्हणजे प्रात:काळच्या
कोवळ्या सूर्य किरणांवर 
      स्वर्णाक्षरांनी कोरलेलं
सुन्दर नाव
 
प्रेम म्हणजे धगधगीत
    दु:खाच्या वेळीही  
        आशेची फूंकर
घालणारं एक विश्रांतिस्थान
 
- भावना दामले