शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (15:27 IST)

मराठी कविता : मन असें आरसा आपला

woman
खरं आहे हे की मन असें आरसा आपला,
जो जसा आहे तसाच त्यात दिसला,
खोटं मनाशी बोलणं शक्य तरी आहे का?
लपवून ठेवणं त्यापासून संभव होईल का?
जे काही चांगलं वाईट हातून घडतं,
खरी साक्ष त्याची फक्त तेच ठेवतं,
समजवत ते आपल्याला क्षणो क्षणी,
जरी आपल्याला पाहत नसेलही कुणी,
खोटं कित्तीही बोललो निधड्या छातीने,
कचरत मन त्यावेळी अनामिक भीतीने.
पण चेहेरा असतो ना वेगवेगळे रंग दाखवायला,
मनाचा सच्चेपणा बेमालूमपणे लपवायला!
तुम्हीच ठरवा मंडळी, चांगलं काय ते
की आपल्या च मनानी, आपल्या ला खायचं ते!!
...अश्विनी थत्ते