खळखळून हसणारा तू आज मात्र हसतोय गालात!
आज दर्या राजाच मन काही औरच म्हणतंय,
हेलकाव्यांचा आवेग काही वेगळंच सांगतोय,
कुणाला बघून इतका तू आलास उचम्बळून ,
तालावर नाच चाललाय तुझा, गेलाय तू रमून,
एक बेभान प्रियकर दिसतोय मला तुझ्यात,
ओढ झालीय अनावर, प्रेमच प्रेम तुझ्या लाटात,
दिसायला सगळं कसं दिसतंय अप्रतीम,
भाषा तुझी कळतेय आम्हांस, कळतंय प्रेम निस्सीम,
असाच राहा रे तू, नाच आपल्याच तालात,
खळखळून हसणारा तू आज मात्र हसतोय गालात!
..अश्विनी थत्ते.