दिला जन्म तेथे माझिया पिलास
पानास पान शिवूनी घरटे बांधले,
जणू जीवास माझ्या झाडास टांगले,
दिला जन्म तेथे माझिया पिलास,
परवड जाहली त्यांची पोटे भरावयास,
तेही निश्चित्त होतें, अन समाधानी,
वाट पाहती माझी, खूपच आशेनी,
माहीत होतें मज हे, उडतील एक दिनी,
नच परतून येतील येथ, न वेडी आशा मनी,
निसर्ग हा हेच शिकवतो, हेंच शिकावे,
जें कार्य दिले विधात्याने, ते श्रद्धे करावे.!!
सौ, अश्विनी थत्ते