मनाची अवस्था एकाएकी नाही खालावत
मनाची अवस्था एकाएकी नाही खालावत,
सतत काही न काही त्यास असतं सतावत,
जातं दुःख खोलवर, आत आंत बसतं रुतून,
जरा कुणी दुखावलं की निघत डोळ्यातून,
कधी आणि कसा निघेल मार्ग बरं ह्यातुन?
प्रश मनी हाच सतत ध्यास हाच मनातून,
वाटतं कधी मिळेल तोडगा, सुचेल काही,
जटील आणि होते, पण असं कधी होत नाही,
सवय होतें दुःखसोबत राहण्याची,
आलेल्या प्रश्नाशी हात मिळवणी करण्याची,
पण हे जीवन गाणे न होते कधी सुरेल,
तडजोड केवळ ही, न बसेल ताळ मेळ !
अश्विनी थत्ते.