बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (16:24 IST)

विसावा निवांत निद्रादेवीच्या कुशीत

marathi poem
विसावा निवांत निद्रादेवीच्या कुशीत,
पहुडतो जीव, विसरुनीया आघात,
राब राब राबतो, पोटाच्या खळगीसाठी,
दोन दमड्या कमवितो, एका दिवसाकाठी,
पाठ लावता भुईस, प्रसन्न देवी होई,
साऱ्या चिंता मनाच्या, त्याच्या दूर जाई,
झोप निवांत, अमृता परी काम करी,
तजेला जीवाला, येई झोप झाल्यावरी,
उशाला हवा धोंडा, धरित्री ची वळकटी,
आभाळा चे पांघरूण, राही भाग्य उभं पाठी!
..अश्विनी थत्ते