स्वार्थासाठी माणूस काय काय करतो...
स्वार्थासाठी माणूस काय काय करतो,
तत्वांना ही आपुल्या विसरूनिया जातो,
कोण आहोत आपण? काय हवं होतें आपल्यास,
स्वार्थ आड आला की, वाढतो विपर्यास,
ठरवून टाकतो स्वतःच काय उत्तम स्वतःसाठी,
काय मूल्य चुकवितो आपण, केवळ आपल्या स्वार्था पोटी,
वाटून जातं मनास केव्हा, पाया च जीवनाचा खंबीर नव्हता,
ज्या तत्वावर तो मूळ उभा होता, तोच अस्थिर होता,
काय न जाणो परिणाम त्याचे इतरांवर होतात,
माणूस तो अविश्वासी ठरतो, आघात केवळ होतात!
..अश्विनी थत्ते