शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (10:00 IST)

गजानन माऊली तुजवीण मज नाही रे थारा

Gajanan Maharaj Shegaon
आर्त हाक माझी पोहचू दे, तुजपाशी,
सकळ संकटाना ठावें तूच तारीशी,
सतत उद्विग्न मन हे होते माझे रे,
सुकर मार्ग, काढून त्यातून मज सावर रे,
गजानन माऊली तुजवीण मज नाही रे थारा,
हेही ठाव मज की तूच माझा सहारा,
माझ्या सवें इतरांही दाव की सन्मार्ग बाबा,
दुखवतो आहे तोच सर्वा, हे सांग तूच बा!
मनात माझ्या काय चालले, हे तुज न सांगणे,
आजवर साथ तुझीच मिळाली,यापुढेही हेच मागणे!
....अश्विनी थत्ते