मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : सोमवार, 13 डिसेंबर 2021 (11:24 IST)

जाणून बुजून कधी कधी घडत नाहीत गुन्हे असे

जीवन जगता जगता कधी अशी चूक घडते, 
आधीच्या सर्व कामावर अगदी पाणीच फिरते,
आपली छबी होते खराब लोकांसमोर,
पाहू शकत नाही समाजात तोंड काढून वर.
जाणून बुजून कधी कधी घडत नाहीत गुन्हे असे,
कधी मात्र फुशारकीत गडी करून बघत असे,
मात्र करतांना काही गोष्टी ठेवावं भान,
तर आणि तरंच तुमचा ही राखला जाईल मान.
आपण वागलो तसें इतरांनी वागलेलं चालेल काय?
प्रश्न आपल्याला विचारून बघा, ते म्हणतंय काय?
...अश्विनी थत्ते