1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. marathi poem

स्वयंपाक रूपी परमेश्वर

marathi kavita
चुल आणि ओटा
हाची परमार्थ मोठा
मीठ मसाल्याची दाणी
मनी कृष्णाची गाणी
पहा मळली कणिक
आहे प्रपंच क्षणिक
छान भाजी ती चिरली
सारी चिंताच जिरली
दिली खमंग फोडणी
केली भोगांची तोडणी
हाती तवा पोळपाट
उरी भक्तीचिये लाट
ताट आणि वाटी
सारे कृष्ण प्रेमासाठी
पळी आणि झारा
आता ना येरझारा
केला वरण मऊ भात
कृष्ण माझे जगन्नाथ
वर तुपाची ती धार
सोपविला सर्व भार
तळली गोल पुरी
कृष्णध्यास लागे उरी
केले कालवण सार
आता संसार हा पार
बघा झाला स्वयंपाक
दिली सद्गुरूंसी हाक
दिली यजमाने पुष्टी
रक्षी कृष्णाचिये दृष्टी.
 
-सोशल मीडिया
पुढील लेख
नाशिक येथे करन्सी नोट प्रेसमध्ये भरती