मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By ऋचा दीपक कर्पे|
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (14:07 IST)

कितीतरी त्या 'सिंधू' त सामावल्या

marathi poem on sindhu tai sapkal
कितीतरी तलाव, ओढे, नद्या 
त्या 'सिंधू' त सामावल्या
बघता बघता त्या 'सिंधू'चा 
महा समुद्र झाला
दुरितांना विसावा मिळाला... 
 
त्या 'सिंधू' च्या लाटांवर 
अलगद तरंगत
लहान होड्यांना न बुडता
किनारा सापडला
 
त्या 'सिंधू' तूनच 
असंख्य मौक्तिक, दुर्मिळ रत्ने 
संपूर्ण जगात विखुरले
आणि अंधाऱ्या जगाला
प्रकाश दिला... 
 
पण अचानक..... 
घड्याळाचे काटे थांबले
जगात अश्रूंचा प्रलय आला.... 
आम्ही सर्वच पोरके झालो
आमचा 'सिंधू' आज
अनंतात विलीन झाला.....! 
 
©©ऋचा दीपक कर्पे