बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (13:30 IST)

आयुष्य कठीण अजिबात नसतं...

आयुष्य कठीण अजिबात नसतं... 
 
कधी नळाला पाणी नसतं... 
कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
 
कधी पगार झालेला नसतो...
कधी झालेला पगार उरलेला नसतो..
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो... 
 
कधी जागा नसते...
कधी जागा असून स्पेस नसते...
कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते...
 
कधी डब्यात आवडती भाजी नसते...
कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते...
दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते...
 
कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो...
कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते...
 
कधी काही शब्द कानावर पडतात...
कधी नको ते शब्द कानावर आदळतात...
 
कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते 
आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात...
 
कधी आपण कसे वागायचे समजत नाही...
कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही... 
 
कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही...
कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही...
 
कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही...
कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही...
 
कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही...
कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते...
कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो... 
 
कधी पैसा असला की नात्यांचा मोह होतो 
आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो...

ताण घेतला तर तणाव... 
आजचे भागले म्हणून आनंद 
आणि उद्याच काय म्हणून चिंता 
आयुष्य कठीण करते...
 
आपण नदी सारखं जगावं...
सतत वहात राहाव.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं..
 
- सोशल मीडिया