शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (16:02 IST)

डोळे उघडे ठेवून जगल तर सर्व काही कळतं

डोळे उघडे ठेवून जगल तर सर्व काही कळतं,
कुणी सांगायची गरजच नाही, आपलं च आपल्याला वळत,
मानवी जीवनच तर एक मोठ्ठी शाळा आहे,
गीरवायला अन शिकायला कित्तीतरी धडे आहे,
जीवनातील चांगले क्षण खुप काही देऊन जातात,
तर कित्ती चांगल्या गोष्टी शिकून पदरात पडतात,
वाईट अनुभव तर बिचारे, मजबूर असतातच, धडा शिकवायला,
त्यातून ही नाही शिकलो, तर देतो दोष नशीबाला,
विविध रंगी जीवन आपलं, बघायचं की डोळे उघडून,
बंद डोळ्यांनी राहील तर , जाईल न सर्व निघून!
दुसऱ्याचं जीवन पण शिकवायला मदत करत,
काय करायचं काही नाही, बरोब्बर कळत,
कशाला मग कुठं जायचं, इथं आहे की भरपूर,
उघडून डोळे, बघा जगा कडे, अनुभव येतील पुरेपूर!
..अश्विनी थत्ते