1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (11:16 IST)

ओळख आयुष्याची इतकी सोप्पी नाही

marathi kavita
ओळख आयुष्याची इतकी सोप्पी नाही,
ओळखल ओळखलं असं वाटत असतानाच बदलतं सर्व काही,
मोजून मापून असं काहीच होतं नसतं,
ठरवलं मनात बरंच काही,पण तसंच कुठं हो घडत?
नकळतपणे कधी मिळतात सुखद धक्के,
तर येणाऱ्या अपयशाने इरादे होतात पक्के,
समोरच्या ला पूर्णपणे ओळखलं अस वाटतं,
तोच गोड बोलून दुखसागरात लोटतो,
तर अशीच असते ओळख, कधीही खरी नसणारी,
विविध वळणावर जीवनाच्या अनपेक्षित वागणारी!
...अश्विनी थत्ते