मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (23:25 IST)

कंटाळा, कुणाला कधी येत नाही, अस कुणी आहे का?

kavita
कंटाळा, कुणाला कधी येत नाही, अस कुणी आहे का?
तोच तो पणा करून, न कंटाळून जाणारे कोणी असतील का?
कंटाळा तेच ते खाण्याचा येतो अगदी सर्वांनाच,
कामातला तोच तो पणाही ठरतो कारणीभूत सदाच,
वेगळेपणा हवा असतो, अगदी प्रत्येकालाच,
मोकळा श्वास हवा असतो, सर्वांनाच,
लहान मुलांपासून, तर अगदी वृद्धांपर्यंत,
कुणीही सुटलं नाही बरं का! हेच सत्य असतं,
काही थोडा ही बदल मिळाला की पुन्हा ताजेतवाने होतात,
तर काही जरा जास्त वेळ घेतात, पण मग तजेलदार दिसू लागतात,
अशी असते  बघा कंटाळवाणी स्थिती माणसाची,
पण कंटाळून कसं चालायचं मंडळी?ही तर गोष्ट आपल्या स नेहमीचीच!!
..अश्विनी थत्ते.