बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (10:56 IST)

काही मंडळींना ना कुणावर विश्वासच नसतो

काही मंडळींना ना कुणावर विश्वासच नसतो,
कित्ती ही काम असलं तरीही तो स्वतः च करत बसतो,
आपल्या पेक्षा कुणी चांगलं करूच शकत नाही, अस  त्यांना वाटतं !
त्यांच्या नजरेत कुणीच चांगलं करू शकत नसत,
या उलट काही लोकं, उंटावरून शेळ्या हाकतात,
परस्पर काम दुसऱ्या वर सोपवून मोकळे होतात,
चुकलं माकल कुणाचं तर त्यांना रागावतात,
पण पुन्हा त्यांच्याच करवे काम ते करतात,
आपल्याच इशाऱ्यावर इतरांना नाचवून घेणारे पण खूप असतात,
हुकमाच्या फैऱ्या सोडत, आपण जागेवरच बसतात.
काम केल्याचा आव तर इतका आणतात,
सर्व जगच ह्यांच्या मुळंच चालतं, असच भासवतात!
व्यक्ती तितक्या प्रकृती, हे तर असच चालायचंच,
काम होण्याशी मतलब असतो, आपण फक्त बघायचं.
..अश्विनी थत्ते.