गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (08:25 IST)

Relieve Depression and Anxietyडिप्रेशन आणि काळजी दूर करण्यासाठी करा या मसाल्यांचे सेवन

Relieve Depression and Anxiety रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की बरेच खाद्य पदार्थ असे आहे जे तुमचे मूड फ्रेश करतात आणि तुम्हाला आनंदीही करतात. हे खाद्य पदार्थ तुमच्या शरीरात काही हार्मोन्सचा स्राव करतात ज्याने तुम्हाला आनंद मिळतो.    
 
हे ही सिद्ध झाले आहे की खाण्यात या वस्तूंच्या कमतरतेमुळे तुमचे मन स्थिर राहत नाही आणि तुम्हाला डिप्रेशन किंवा काळजी राहते. पण काय तुम्हाला माहीत आहे की काही मसाले असे ही आहे जे आम्हाला एनर्जी देतात आणि आनंदी ही ठेवतात?  
 
सर्वात आधी मन प्रसन्न ठेवणारी वस्तू आहे कलमी (दालचिनी). यात एक निश्चित साखरेची सुगंध असते ज्याने तुम्हाला जास्त साखर खाण्याची इच्छा होत नाही. हे मेंदूला उत्तेजित करण्यासाठी उत्तम मानले जाते तसेच स्मरणशक्ती वाढवण्यात आणि मेंदूला केंद्रित ठेवण्यास मदतगार ठरते. ही मूड बनवणारी वस्तू आहे.  
पुढची औषधी आहे जो तुमचा मूड बनवू शकते ती आहे केशर. हा आनंद वाढवणारा मसाला आहे. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की  केशर एक चांगला तनावरोधी आहे. हे मन प्रसन्न करणारे आणि तणाव दूर करण्याचा सर्वात उत्तम समाधान आहे.  
haldi
पिवळी हळद मन खूश ठेवण्यासाठी मानली जाते. यात एंटी-इन्फ्लामेट्री आणि एंटी-ऑक्सीडेंट्स प्रचूर मात्रेत असते. ही हळद मनाला उत्तेजित करणार्‍या सेरोटोनिनला वाढवते.