मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (17:02 IST)

Senior Citizen Day सिनिअर सिटीझन झालो,आयुष्याची संध्याकाळ आली

कधी डोक्यावर चांदी आली न कळलं,
आत्ता आत्ता पर्यंत काका म्हणायचे, आबा कधी झालो न समजलं,
नौकरी त असतांना वेळेचा अन माझा हिशोब जमेना,
आता तर वेळच वेळ असतो, घालवावा कसा ते उमगे ना!
काळ, कामा च्या गणितात, न जाणे काय काय सुटलं,
पण आता काळ ही गेला न कामही, हाती नक्की काय आलं?
सतत चिडचिड केली, घरातले हळूच मागं सरले,
रिकामा वेळ आहे, पण ते कोणीही माझ्यासाठी न थांबले,
सिनिअर सिटीझन झालो,आयुष्याची संध्याकाळ आली,
काय कमावलं काय गमवल, याची माहिती झाली,
आता वाटतं घराला वेळ द्यायचा होता, न कुटुंब जवळ करायचे होते,
कामाचा व्याप कमी करून, थोडं वेगळं आयुष्य जगायचे होते!
....अश्विनी थत्ते.