बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (10:48 IST)

Accident In Mahoba:चिमुकल्याला गाडीने फरफटत नेलं,मुलाचा दुर्देवी मृत्यू

accident
उत्तर प्रदेशातील महोबा येथे शनिवारी एक वेदनादायक रस्ता अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाने स्कूटीवर बसलेल्या आजोबा आणि नातवाला उडवले. अपघातानंतर ट्रक चालकाने नातवाला 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. महोबा येथील कानपूर-सागर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर 6 वर्षीय चिमुकला  ट्रकमध्ये अडकला होता. त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असताना निष्काळजी ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकाने ट्रकखाली स्कूटीमध्ये अडकलेल्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला 2 किलोमीटर अंतरापर्यंत नेले.
 
आजोबा -नातू बाजारात जात होते
 या अपघातात आजोबा आणि नातू दोघांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर कोतवाली भागातील कानपूर सागर राष्ट्रीय महामार्गावर उदित नारायण आपल्या नातवासोबत बाजारात जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात उदित नारायण यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा 6 वर्षांचा नातू ट्रकमध्ये अडकला होता. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.