गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (17:22 IST)

3 बायकांनी मिळून नवऱ्याला चोपलं

beaten
उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील शाहगंज तहसील परिसरात गुरुवारी दोन पत्नींनी मिळून पतीला बेदम मारहाण केली.तरुणाने चार लग्ने केली होती, त्यानंतर त्याने तीन बायका सोडल्या. पहिल्या पत्नीलाही तो आपल्या मुलाला भेटू देत नव्हता. न्यायालयाच्या आवारात झालेल्या मारामारीनंतर लोकांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पठाणीटोला येथील रहिवासी असलेल्या फजलुर रहमानने चार लग्न केले आहेत. पहिली पत्नी शाहगंज नगर येथील इराकियाना परिसरातील रहिवासी आहे. 
 
तर, दुसरी पत्नी कानपूरमधील जाजमाऊ येथील रहिवासी आहे आणि तिसरी पत्नी आझमगडची रहिवासी आहे. या तिन्ही महिलांचा आरोप आहे की, फजलुर रहमानने त्यांना मुले झाल्यानंतर सोडून दिले. आता तो चौथ्या पत्नीसोबत राहतो. 
 
फजलुर रहमानच्या पहिल्या पत्नीचे म्हणणे आहे की तिला 13 वर्षांचा मुलगा आहे, ज्याला फजलुर रहमान आपल्याजवळ ठेवतो.त्यासाठी त्यांनी एकतर्फी आदेश काढला होता. या प्रकरणी पत्नीच्या अपिलावर न्यायालयाने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मुलाला भेटण्याचे आदेश दिले आहेत. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिला आपल्या मुलाला भेटू देत नाही. 
 
या प्रकरणी शहागंज तहसील येथील ग्राम न्यायालयात गुरुवारी खटल्याची तारीख होती. या खटल्याचा बचाव करण्यासाठी फजलुर रहमान शहागंज येथे आले होते,तेथे त्याच्या तीन पत्नींनी त्याला पकडून चांगलेच चोपून काढले.दोन्ही पक्षांना बोलावून प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
Edited by - Priya Dixit