रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (11:48 IST)

लखीमपूर खेरी अपघात: अपघात पाहणाऱ्या लोकांचा अपघात, 5 जणांचा मृत्यू

accident
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील गोला बहराइच महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. जिथे अनियंत्रित ट्रकने अनेकांना तुडवले आहे. या अपघातात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत.पिलीभीत बस्ती रोडवरील सदर कोतवाली हद्दीतील रामापूर चौकी परिसरातील पांगी खुर्द गावात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण गंभीर जखमी झाले.

सायंकाळी 7.40 वाजता हा अपघात झाला. कार आणि स्कूटी यांच्यात झालेल्या अपघातानंतर जखमींना पाहण्यासाठी गावकरी रस्त्याच्या कडेला आले होते,बहराइचहून लखीमपूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांवर चढला. या घटनेनंतर सर्वत्र हाहाकार माजला . पोलिसांनी माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात दाखल केले.

मुख्यमंत्री योगी यांनी ट्विट करून अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आणि तातडीने मदत आणि बचाव करण्याच्या सूचना दिल्या.
 
पिलीभीत बस्ती रस्त्यावरील पांगी खुर्द गावाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास स्कूटी आणि कारची धडक झाली, यात स्कूटीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, जखमींना पाहण्यासाठी गावातील लोक रस्त्याच्या कडेला जमा होऊ लागले. दुसरीकडे दोन कार चालकांनीही वाहन थांबवून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बहराइचहून लखीमपूरला जाणारा एक भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकला आणि अपघात पाहणाऱ्या गर्दीवर चढला. 
 
या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड झाला असून मार्गावर बराच वेळ जाम झाला होता. दरम्यान, ट्रक चालक तेथून फरार झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ही घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांनी पाच जणांचा मृत्यूंना दुजोरा दिला. जखमींना उपचार देण्यास प्रथम प्राधान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर घटनेच्या कारणाचा शोध घेतला जाईल.
 
Edited By - Priya Dixit